महाराष्ट्र पोलीस : 100 क्रमांक होणार बंद पोलीस, महिला हेल्पलाइन साठी 112 हा एकच नंबर.

महाराष्ट्रात पोलिसांशी संपर्क साधण्याचा शंभर हा क्रमांक बंद होणार आहे त्या ऐवजी 112 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू होणार आहे. या क्रमांकावर पोलिस अग्नीशमन आणि महिला हेल्पलाइन या तीन प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. देशातील 20 राज्यांनी ही सेवा सुरु केली आहे त्यातच महाराष्ट्र राज्याने देखील हा उपक्रम राबविण्याचा विचार सुरू केला आहे.

महाराष्ट्र राज्यात पोलिसांना संपर्क करण्यासाठी 100 ,अग्निशमन विभागाला संपर्क करण्यासाठी 101 आणि महिला हेल्पलाईन ला संपर्क करण्यासाठी 1090 हे क्रमांक उपलब्ध आहेत. याचे एकत्रीकरण करून ही प्रक्रिया केंद्रीकृत केली जाणार आहे. अप्पर पोलीस महासंचालक एक जगन्नाथन यांची सेंट्रलाइज हेल्पलाईन सिस्टिमचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचा वायरलेस विभाग आणि तांत्रिक व प्रशिक्षण विभागाच्या प्रमुखांची राज्यस्तरीय समिती यासाठी स्थापना करण्यात आली आहे.
देशभरात 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात 112 हा क्रमांक सुरू आहे महाराष्ट्र पोलिसांनी देखील ही सेवा सुरू करण्यासाठी उपाययोजना सुरू केले आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत 112 हेल्पलाईन क्रमांक राज्यात सर्वत्र सुरू करण्याचा महाराष्ट्र पोलिसांचा विचार आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्रातून संबंधितांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण दिले जाणार आहे .एखाद्या व्यक्तीने फोन केल्यानंतर तो फोन कुठून आला आहे. याची माहिती तात्काळ संबंधित यंत्रणांना मिळेल. पोलिस अग्निशमन दल अथवा महिला हेल्पलाईन यांच्याकडे त्यांची माहिती एकाच वेळी उपलब्ध होईल 112 हेल्पलाईनवर आलेल्या फोनला कोणी काय प्रतिसाद द्यायचा, माहितीची देवाण-घेवाण ,मदत याबाबतची प्रक्रिया तसेच प्रशिक्षण या बाबींची पूर्तता झाल्यानंतर शंभर क्रमांक बंद केला जाणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *