2 बहिणींना दिली जाणार फाशीची शिक्षा, यांचे कारनामे ऐकून अंगावर काटा येईल….

निर्भया प्रकरणातील चार दोषींना त्यांच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा झाली असून या चार दोषींना फाशी देण्यात आली आहे. निर्भयाला न्याय मिळण्यास सुमारे 7 वर्षे लागली होती आणि बरीच सुनावणी झाल्यानंतर निर्भयाच्या दोषींना फा;शी देण्यात आली. निर्भया प्रकरण हा आपल्या देशातील सर्वात मोठ्या गु;न्ह्यांपैकी एक होता आणि या गुन्ह्यासाठी चार दोषींना फाशीची शिक्षा देखील कमी होती. बालकांच्या हत्याकांडात प्रकरणातील मृत आरोपी अंजना गावित हिच्या मुली रेणुकाबाई आणि सीमा यांचा दयेचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणुका आणि सीमा या दोघींच्या फाशीच्या शिक्षेची लवकरच अमलबजावणी होणार आहे.

महाराष्ट्रात ११९० ते १९९६ दरम्यान रेणुकाबाई, सीमा, किरण शिंदे यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा येथून १३ मुलांचे अपहरण केले. त्यापैकी ९ जणांची त्यांनी हत्या केली. मात्र, सरकारी पक्षाला केवळ पाच जणांची हत्या झाल्याचे सिद्ध करता आले. या प्रकरणी दोन बहिणींना फाशीची शिक्षा झाली. मुख्य आरोपी अंजनाबाई गावित हिचा १९९७ मध्ये मृत्यू झाला.

गावित ही गरीब कुटुंबातील बालकांना पळवून नेऊन त्यांच्याकडून चोरी करून घ्यायची. त्यानंतर त्यांना ठार मारत होती. या कृत्यामध्ये तिच्या दोन मुली रेणुका, सीमा आणि जावई किरण यांनी मदत केली होती. या प्रकरणात किरण शिंदे याला माफीचा साक्षीदार बनविण्यात आले होते. २०१२ साली निर्भयावर पाच जणांनी ब;ला;त्कार केला होता. ही घटना दिल्लीची होती. या पाच दोषींपैकी एकाने स्वत: ला तुरुंगात फा;शी दिली. अन्य चार दोषी सात वर्ष तुरूंगात होते. त्याचबरोबर अलीकडेच या चौघांना फा;शीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ज्याद्वारे निर्भयाला न्याय मिळाला आहे. अख्खा देश बर्‍याच दिवसांपासून निर्भयाच्या दोषींच्या शिक्षेची वाट पाहत होता आणि ही प्रतीक्षा मार्च महिन्यात संपली.


केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रेणुकाबाई आणि सीमा यांचा दयेचा अर्ज फेटाळण्याची शिफारस केली होती. ही शिफारस मिळाल्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जुलै महिन्यातच रेणुकाबाई आणि सीमा यांचा दयेचा अर्ज फेटाळली होती. दयेचा अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे रेणुकाबाई आणि सीमा या दोघींना फाशी दिली जाणार हे निश्चित झाले होते. मात्र फाशीची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी सरकारी फायली वेगाने सरकू लागल्यामुळे शिक्षेची अमलबजावणी लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


निर्भयाच्या दोषींना शिक्षा दिल्यानंतर आता लोकांच्या नजरा. निर्दोष मुलांना ठार करणाऱ्या दोन बहिणींकडे लागल्या आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापुरात राहणाऱ्या या दोन सख्या बहिणींवर 6 मुलांचा खून केल्याचा आरोप आहे.आणि त्या दोघांनाही दोषी ठरविण्यात आले आहे आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीमा गावित आणि रेणुका गावित अशी या दोन बहिणींची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *